Sunil Balasaheb Dhumal
जनता दल संयुक्त पक्षाचे महाराष्ट्राचा चेहरा म्हणून कपिल पाटलांची ओळख होती.
पत्रकार असलेल्या पाटलांनी लोकभारती संघटना स्थापन केली होती. ती नंतर नितीशकुमारांच्या जेडीयू पक्षात विलीन केली.
जेडीयू पक्षाने त्यांच्याकडे 2022 मध्ये राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली होती.
पाटील हे सलग तीन वेळा महाराष्ट्र विधान परिषदेत मुंबई शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. ते राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्तही आहेत.
त्यांनी ओबीसी आणि मंडल आयोगाच्या चळवळीत योगदान दिले. छात्रभारती, गांधी-आंबेडकर फाउंडेशन, नवनिर्माण शिक्षण संस्था आणि शिक्षक भारतीच्या स्थापनेत भूमिकाही बजावली.
देशातील जनता नितीशकुमार यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहते, असे विधान केल्याने ते चर्चेत आले होते.
ते धर्मनिरपेक्ष समाजवादी तत्त्वांशी कधीही तडजोड करत नाहीत असे मानले जाते. यातूनच त्यांनी एनडीएत सहभागी झालेल्या नितीशकुमारांची साथ सोडली.
आता कपिल पाटलांनी समाजवादी गणराज्य पार्टी हा नव्या पक्षाची स्थापना केली असून उद्धव ठाकरेंसोबत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.