Ganesh Sonawane
पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी सरपंच निर्मला शुभम नवले यांनी अलीकडेच एक नवीन कार खरेदी केली आहे.
त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून कारचे फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी शेअर केलेले फोटो सध्या सोशल मीडियावरवर व्हायरल झाले आहेत.
निर्मला यांनी खरेदी केल्या गाडीचे नाव Mahindra BE 6 असे आहे.
या कारची किंमत 22 ते 25 लाख रुपये इतकी आहे.
यापूर्वी निर्मला नवले यांनी रेंज रोव्हर ही कार खरेदी केली होती. त्या कारची किंमत 3 कोटी रुपये इतकी आहे.
निर्मला नवले या सोशल मीडियावर अॅक्टीव असून कायम चर्चेत असतात.
निर्मला नवले या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सक्रिय असून त्यांच्याकडे सध्या कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवती काँग्रेस, महाराष्ट्र राज्य हे पद आहे.
इन्स्टाग्रामवर निर्मला यांचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि युट्यूब चॅनलवर 67 हजारांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत.