Deepak Kulkarni
पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या सरपंच असलेल्या निर्मला नवले यांचा सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला आहे.
सोशल मीडियावर त्यांची मोठी क्रेझ आहे. इन्स्टाग्रामवर त्यांचे तब्बल 514K followers आहेत.
निर्मला नवले यांची लोकप्रियता पाहूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याकडे राष्ट्रवादीचे महत्त्वाचे पद दिले आहेत.
आता या सरपंच मॅडमच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे.
नवले यांनी त्यांच्या घरातील गणेशोत्सवाचे खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
निर्मला नवले यांनी त्यांच्या फोटोंना सुंदर कॅप्शनही दिलं आहे. त्याची जोरदार चर्चा आहे.
नवले यांनी यावेळी घरात बाप्पाची स्थापना म्हणजे फक्त मूर्ती नाही, तर आनंद, श्रद्धा आणि एकतेची सुरुवात असते असं म्हटलंय.
सरपंच मॅडमनं इन्स्टाग्रामवरच्या फोटोंवर भाष्य करताना गणरायाच्या चरणी केलेली पूजा आपल्याला नेहमीच सद्बुद्धी, सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देवो, अशीही प्रार्थना केली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवले यांनी शेअर केलेले सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर त्यांच्या चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.