Rashmi Mane
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 व्या कारगिल विजय दिवसानिमित्त द्रास येथे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधान मोदींनी लडाखमधील द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकालाही भेट दिली. द्रास हे केंद्रशासित प्रदेश लडाखमधील कारगिल जिल्ह्यात वसलेले शहर आहे.
द्रास शहराला लडाखचे प्रवेशद्वार असेही म्हणतात. लष्करप्रमुखांनी द्रासमध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.
भारत आज २५ वा कारगिल विजय दिवस साजरा करत आहे.
1999 मध्ये भारताने पाकिस्तान विरुद्ध झालेले युद्ध जिंकले होते. भारताच्या विजयाच्या 'रौप्य महोत्सव' निमित्त, कारगिल जिल्ह्यातील द्रास येथे 24 ते 26 जुलै या कालावधीत भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहीदांना पुष्पांजली वाहल्यानंतर पंतप्रधानांनी 'शहीद मार्ग' (वॉल ऑफ फेम) ला भेट दिली.
द्रास येथील कार्यक्रमात मोठ्या संख्येने वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकारी, शौर्य पुरस्कार विजेते, माजी सैनिक आणि कारगिल युद्धात बलिदान दिलेल्या शूर सैनिकांचे कुटुंबीय सहभागी झाले होते.