Rashmi Mane
राष्ट्रपती भवनातील सर्वात भव्य सभागृह म्हणजे दरबार हॉल, ज्याला आता 'गणतंत्र मंडप' असे नाव देण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनातील दोन हॉलची नावे बदलली आहेत.
सर एडविन लुटियन्स यांनी 1911 मध्ये हे भव्य राष्ट्रपती भवन बांधण्यास सुरुवात केली आणि 1932 मध्ये पूर्ण केली.
स्वातंत्र्यापूर्वी दरबार हॉलला थोर्न हॉल म्हणत.
दरबार हॉल हा देशातल्या अनेक सोनेरी क्षणांचा साक्षीदार आहे. भारताचा सर्वोच्च पुरस्कार मानला जाणारा भारतरत्न पुरस्कार वितरण सोहळा देखील इथेच पार पडतो.
1932 मध्ये जेव्हा ही इमारत पूर्ण झाली तेव्हा त्याला वायसराय हाउस असे म्हणतात. त्यानंतर या हॉलला थॉर्न हॉल असे नाव देण्यात आले. पण भारत स्वतंत्र झाल्यावर या खोलीला दरबार हॉल असे नाव देण्यात आले.
तसेच या हॉलला दुसरे नाव देखील होते - त्याचे नाव म्हणजे सिंहासन कक्ष, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
दरबार हॉल हा राष्ट्रपती भवनाच्या सर्वात भव्य हॉल आहे. 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर जवाहरलाल नेहरूंनी येथे देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती.