Jagdish Patil
दरवर्षी कारगिल विजय दिवस 26 जुलै रोजी साजरा केला जातो. कारगिल युद्ध भारत-पाकिस्तानमध्ये 3 मे ते 26 जुलै 1999 मध्ये लढले गेले.
पाकने भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्यामुळे हे युद्ध सुरू झालं. भारतीय जवानांनी 26 जुलैला पाकिस्तानचा पराभव करत कारगिलसह सर्व ठाणी ताब्यात घेतली.
विजयदिवसानिमित्त सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील अंतवडी गावचे सुपुत्र महादेव निकम या हुतात्म्याची शौर्य गाथा जाणून घेऊया.
सातारा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील लोकांना जन्मताच सैन्यात भरती होण्याचं वेड असतं. असंच वेड महादेव निकम यांना लागलं होतं.
जिद्द आणि प्रयत्नांच्या जोरावर ते वयाच्या 21 व्या वर्षी सैन्यात भरती झाले. सैन्य प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय सेनेच्या 7 मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये रुजू झाले.
महादेव घरातील एकुलते एक मुलगा होते. 6 जून 1998 रोजी त्यांनी उज्ज्वला यांच्याबरोबर लग्न केलं.
पाकिस्तानी सैन्याने कारगिल, द्रास, बटालिक येथील भारतीय चौकीवर कब्जा केल्यानंतर 3 मे 1999 ला भारताने पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारलं.
या युद्धात महादेव पाकिस्तानी सैन्याबरोबर 2 महिने लढले आणि 26 जूनला शहीद झाले. योगायोगाने त्याच दिवशी त्यांच्या मुलीचा जन्म झाला.
त्यानंतर एका महिन्यातच भारताने युद्ध जिंकलं. या युद्धाला 'ऑपरेशन विजय' असं नाव दिलं गेलं. त्यावरूनच महादेव यांच्या वीरपत्नी उज्ज्वलाताईंनी आपल्या मुलीचे नाव 'विजया' ठेवलं.
NEXT : ट्रॅफिक समस्या सोडवण्यासाठी अजितदादा भल्या पहाटे, भर पावसात, चिखल तुडवत हिंजवडीत दाखल; पाहा PHOTOS