Kargil War Hero Colonel Sonam Wangchuk: 'लायन ऑफ लडाख' ते कारगिल वॉरचे हिरो...! कर्नल सोनम वांगचुक यांची अभिमानास्पद स्टोरी...

Deepak Kulkarni

'लडाखचा सिंह'

कारगिल युद्धातील हिरो आणि 'लडाखचा सिंह' म्हणून ओळखले जाणारे निवृत्त कर्नल सोनम वांगचुक (निवृत्त) यांचे वयाच्या 61 व्या वर्षी लडाख येथील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Kargil war hero Colonel Sonam Wangchuk | Sarkarnama

'महावीर चक्र'

1999 च्या कारगिल युद्धातील सुरुवातीच्या नायकांपैकी ते एक होते आणि त्यांना 'महावीर चक्र' या सन्मानाने गौरवण्यात आले होते.

Kargil war hero Colonel Sonam Wangchuk | Sarkarnama

लष्करी प्रवास

तीन दशकांचा आणि विविध युद्धक्षेत्रांचा विस्तार असलेला त्यांचा लष्करी प्रवास, ५,५०० मीटर उंचीवरील एका गोठलेल्या पर्वतरांगेवर व्यतीत केलेल्या एकाच रात्रीमुळे विशेष ओळखले जाऊ लागला.

Kargil war hero Colonel Sonam Wangchuk | Sarkarnama

धाडसी कमांडर

वांगचुक यांनी लडाख स्काऊट्सचे धाडसी कमांडर म्हणून त्यांनी देशासाठी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहणार आहे.

Kargil war hero Colonel Sonam Wangchuk | Sarkarnama

कर्नल वांगचुक यांच्या निधनाची बातमी भारतीय लष्कराचे माजी कमांडर कर्नल वाय. के. जोशी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरून दिली आहे.

Kargil war hero Colonel Sonam Wangchuk | Sarkarnama

लष्कराकडूनही शोक

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच भारतीय लष्कराकडूनही वांगचुक यांच्या निधनाबद्दल शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या आहेत.

Kargil war hero Colonel Sonam Wangchuk | Sarkarnama

कमालीचं धैर्य

कारगिल युद्धाप्रसंगी अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असताना बर्फाच्छादित डोंगररांगांवर कमालीचं धैर्य दाखवत पाकिस्तानला चितपट केलं होतं.

Kargil war hero Colonel Sonam Wangchuk | Sarkarnama

कर्नल सोनम वांगचुक यांचा जन्म 11 मे 1964 रोजी लडाखमधील लेह जिल्ह्यातील शंकर येथे झाला. त्यांचे वडील 14 व्या दलाई लामांचे सुरक्षा अधिकारी होते. वांगचुक यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी मिळवल्यानंतर भारतीय सैन्याच्या आसाम रेजिमेंटमध्ये रुजू झाले होते.

Kargil war hero Colonel Sonam Wangchuk | Sarkarnama

NEXT महिलांची 'डिजिटल' बदनामी आता महागात पडणार, थेट ३ वर्षांची जेलवारी

Digital Defamation Law | Sarkarnama
येथे क्लिक करा...