Ganesh Sonawane
लोकांमध्ये कायद्याचा धाक नसल्याचे भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरुन दिसून आले. महिलांचे हजारो व्हिडीओ व्हायरल करुन बदनामी करण्यात आली.
महिलांबाबत अश्लील व्हिडीओ, ईमेल, आक्षेपार्ह मजकूर, फोटो सोशल मीडिया किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमातून पसरवल्यास, व्हायरल करण्याची धमकी दिल्यास या प्रकरणांत गुन्हा नोंद होणार आहे.
ही प्रकरणे लैंगिक गुह्याच्या श्रेणीत समाविष्ट केली आहेत. त्यासाठी ३ वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. याबाबतचे विधेयक विधिमंडळांत मंजूर झालेले आहे.
डिजिटल बदनामीमध्ये ऑनलाइन माध्यमांचा वापर करून एखाद्या व्यक्तीची किंवा संस्थेची प्रतिष्ठा मलिन करण्याच्या विविध कृत्यांचा समावेश होतो.
महिला आणि लहान मुलांवरील अत्याचारांच्या (बलात्कार, अॅसिड हल्ला) तक्रारींसाठी 'शक्ती कायद्या' अंतर्गत जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये किंवा महिला हेल्पलाइन १०९१/११२ वर तक्रार नोंदवता येते.
'शक्ती कायद्यातील' अत्यंत कठोर तरतुदी आता नवीन केंद्रीय कायद्यात समाविष्ट केल्या आहेत.
यामध्ये अॅसिड हल्ल्यातील पीडितेची ओळख गुप्त ठेवणे आणि डिजिटल माध्यमातून महिलांची बदनामी (सायबर छळ) है गंभीर लैंगिक गुन्हे मानून शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
या सुधारणांमुळे डिजिटल युगात महिलांची सुरक्षा अधिक मजबूत होण्यास मदत होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.