Pradeep Pendhare
कर्नाटक सरकारने राज्यात 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदीची घोषणा अर्थसंकल्पात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली.
आंध्रप्रदेश सरकारने 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास निर्बंध घालण्यात येतील, असे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले.
ही बंदी 13 ते 16 वर्षांखालील मुलांसाठी करता येईल का, यावर आंध्रप्रदेशच्या विधानसभेत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
कर्नाटक सरकारच्या निर्णयाचे पालकांनी स्वागत केले असले तरी, बंदीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत साशंकता व्यक्त केली आहे.
कर्नाटक सरकारच्या या निर्णयाला राज्यात केवळ दहाच टक्के यश मिळेल, असे तज्ज्ञांनी निरीक्षण नोंदवलं आहे.
कर्नाटकच्या या निर्णयानंतर संपूर्ण भारतात 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्यासाठीच्या चर्चेनं अधिक जोर धरला आहे.
आर्थिक सर्वेक्षणात शिफारशीमंध्ये केंद्र सरकारनं मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबत वयावर आधारित मर्यादा घालण्याचा विचार करावा, असा सल्ला दिला.
भारतात सोशल मीडियाच्या संदर्भात, अशी बंदी घालणं सोपं नसून, या प्रकारच्या निर्णयांना कायदेशीर आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं, असं तज्ज्ञांनी निरीक्षण नोंदवलं आहे.
ऑस्ट्रेलियात अलीकडेच 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली. असं करणारा तो जगातील पहिलाच देश बनला आहे.