Pradeep Pendhare
इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर जगातील शिया मुस्लिम समुदाय युद्धाविरोधात निदर्शनं करत आहे.
इराण अन् इस्रायलमधील संघर्षानंतर जगभरात आणि भारतात शिया मुसलमानांची संख्या किती आहे, हे समजून घेऊयात.
जगभरात शिया मुसलमानांची संख्या 20 ते 26 कोटी असून, जगातील प्रत्येक 100 मुसलमानांपैकी सुमारे 10 ते 13 जण शिया आहे. उर्वरित मुसलमान सुन्नी पंथाचे आहेत.
शिया लोकसंख्येच्या बाबतीत इराण जगात अव्वल असून, तिथं 8 ते 8.5 कोटी लोकसंख्या आहे.
इराणनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची शिया लोकसंख्या भारतात आहे. भारतात 3 ते 5 कोटी लोक आहेत.
भारतात शिया समुदाय उत्तर प्रदेश, बिहार, काश्मीर, हैदराबाद, मुंबई आणि इतर काही भागांत आढळतो. लखनऊ शिया संस्कृतीचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते.
पाकिस्तान शिया लोकसंख्या 2.5 ते 4.5 कोटी असून, एकूण मुस्लिम लोकसंख्येतील वाटा 10 ते 20% आहे.
इराकमध्ये शिया मुसलमान बहुसंख्य आहेत. मुस्लिम लोकसंख्येतील शिया वाटा 65 ते 70% असून, एकूण संख्या 2 ते 2.5 कोटी आहे.
जगात केवळ चार देश असे आहेत, इराण, इराक, अझरबैजान अन् बहरीन जिथं शिया मुसलमान बहुसंख्य आहेत. परंतु बहरीनमध्ये सत्ताधारी व्यवस्था सुन्नी राजघराण्याच्या हाती आहे.
अझरबैजान, लेबनॉन, येमेन, अफगाणिस्तान, तुर्की या देशांमध्ये देखील शिया समुदाय राजकीयदृष्ट्याही प्रभावी आहे.