RSS update : शाळा-कॉलेजमध्ये RSS च्या कार्यक्रमांवर बंदी? काय आहे काँग्रेस सरकारचा प्लॅन?

Rajanand More

RSS

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला नुकतीच 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. दिल्लीत झालेल्या विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.

RSS | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांना पत्र

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे पुत्र व कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांना पत्र लिहिले होते.

Mallikarjun Kharge

बंदीची मागणी

खर्गे यांनी पत्रात सरकारी शाळा, कॉलेज तसेच सरकारी इमारतींच्या आवारात आरएसएसच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली होती.

RSS Chief Mohan Bhagwat | Sarkarnama

मंत्रिमंडळात निर्णय

कर्नाटक कॅबिनेटच्या गुरूवारी (ता. 16) झालेल्या बैठकीत आरएसएसच्या कार्यक्रमांबाबत नवे नियम तयारी करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

Karnataka CM | Sarkarnama

काय नियम?

राज्यातील सर्व सरकारी व सरकारी अनुदानित शाळा आणि कॉलेज, सरकारी कार्यालयांच्या परिसरात ‘आरएसएस’सारख्या संस्थांना कार्यक्रम किंवा कोणताही उपक्रम घेण्याची परवानगी देण्याबाबत नवे निर्णय केले जाणार आहेत.

RSS | Sarkarnama

सर्व नियमांचा अभ्यास

गृह, विधी व शिक्षण विभागाच्या यापूर्वीच्या नियमांचा अभ्यास करून सुधारित नियम तयार केले जाणार असल्याची माहिती प्रियांक खर्गे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली.

RSS 100 Years

दोन दिवसांत लागू

सरकारकडून तयार करण्यात येणाऱ्या नियमांची अंमलबजावणी दोन ते तीन दिवसांत होणार असल्याचेही खर्गे यांनी स्पष्ट केले.

RSS

वाद

खर्गे यांच्या पत्रानंतरच मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. भाजपने खर्गे यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता कॅबिनेटमध्येही निर्णय घेण्यात आल्याचा वाद वाढण्याची शक्यता आहे.

RSS

NEXT : तेजस्वी यादव यांची एकूण संपत्ती किती? मागील 5 वर्षांत झाली तब्बल 'इतक्या' लाखांची वाढ

येथे क्लिक करा.