Jagdish Patil
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी बुधवारी राघोपूर विधानसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी मालमत्तेची माहिती दिली आहे. 2020-21 साली त्यांची संपत्ती 2,14,350 रुपये इतकी होती.
प्रतिज्ञापत्रानुसार, मागील पाच वर्षांत त्यांचे उत्पन्नात सातत्याने वाढ झाली असून 2024-2025 या वर्षासाठीचं एकूण उत्पन्न 11,46,610 रुपये दाखवलं आहे.
त्यांच्याकडे 6.12 कोटींपेक्षा जास्त किमतीची जंगम तर 1.88 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी राजश्री यांच्या नावावर 59.69 लाखांची मालमत्ता आहे.
तर मुलगी कात्यायनीच्या नावावर 31.70 लाखांची मालमत्ता असून मुलगा इराज याच्याकडे 8,99,000 रुपयांची मालमत्ता आहे.
प्रतिज्ञापत्रात तेजस्वी यादवांनी त्यांच्याकडे दीड लाख, पत्नी राजश्रीकडे एक लाख आणि मुलगी कात्यायनीकडे 25,000 रुपयांची कॅश असल्याचं दाखवलं आहे.
तसंच तेजस्वी यादव यांच्याकडे 200 ग्रॅम सोने तर पत्नीकडे 480 ग्रॅम सोने आणि दोन किलो चांदी आहे.
तेजस्वी यादव यांच्या नावावर भाऊ तेज प्रताप यादव आणि आई राबडी देवी यांच्यासोबत घेतलेले 55.55 लाखांचे संयुक्तिक कर्ज आहे.