दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी 'क्लाऊड सीडिंग'; नेमके काय आहे हे तंत्रज्ञान, जाणून घ्या थोडक्यात

Aslam Shanedivan

कर्नाटक सरकार

महाराष्ट्राच्या शेजारी असणाऱ्या कर्नाटक सरकारने संभाव्य दुष्काळी परिस्थिती मात करण्यासाठी २८.२५ कोटींची योजना आखली आहे.

Cloud Seeding Project | Sarkarnama

‘क्लाऊड सीडिंग’

पावसाची कमतरता आणि संभाव्य दुष्काळी परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी ‘क्लाऊड सीडिंग’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

Cloud Seeding Project | Sarkarnama

एचएएल विमानतळ

नुकताच एचएएल विमानतळावर ‘क्लाऊड सीडिंग’साठी विशेषतः सज्ज केलेल्या हलक्या विमानाला राष्ट्रध्वज आणि राज्यध्वज दाखवून मंत्र्यांनी चालना दिली.

Cloud Seeding Project | Sarkarnama

क्लाऊड सीडिंग’ म्हणजे?

ढगांमध्ये असलेल्या आर्द्रतेचे पावसात रूपांतर व्हावे, यासाठी विशिष्ट रसायनांची कृत्रिमरीत्या फवारणी करून वर्षा निर्मितीची प्रक्रिया गतिमान करण्याच्या वैज्ञानिक पद्धतीला ‘क्लाऊड सीडिंग’ म्हटले जाते.

Cloud Seeding Project | Sarkarnama

रसायनांचा वापर

ढगांचे स्वरूप, ते उष्ण आहेत की, थंड यावर रसायनांचा वापर ठरविला जातो. यासाठी प्रामुख्याने सिल्व्हर आयोडाइडचा वापर केला जातो.

Cloud Seeding Project | Sarkarnama

बर्फाची स्फटीकं

हे रसायन ढगांमधील सूक्ष्म जलकण एकत्र आणून त्यांचे मोठ्या थेंबांमध्ये किंवा बर्फाच्या स्फटिकांमध्ये रूपांतर होण्यास मदत करते.

Cloud Seeding Project | Sarkarnama

यांचाही वापर

याशिवाय पोटॅशियम आयोडाइड, ड्राय आइस (घन कार्बन डाय ऑक्साइड) आणि सोडियम क्लोराइड अर्थात सामान्य मीठ यांचाही परिस्थितीनुसार वापर केला जातो.

Cloud Seeding Project | Sarkarnama

पाऊस

ही प्रक्रिया झाल्यानंतर सुमारे ३० मिनिटे ते एका तासाच्या कालावधीत पाऊस पडण्याची शक्यता असते.

Cloud Seeding Project | Sarkarnama

फडणवीस सरकारचा जरांगेंचं आंदोलन तापलं असतानाच मराठा समाजासाठी आणखी एक मोठा निर्णय; विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

आणखी पाहा