Deepak Kulkarni
गेल्या 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं आहे. तसेच त्यांनी मागण्या मान्य केल्या नाही, तर मुंबईत धडकण्याचा इशाराही दिला आहे.
राज्य सरकारनं मनोज जरांगेंच्या बहुतांश सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. तरीही त्यांची काही मागण्यांसाठी 15 सप्टेंबरचा अल्टिमेटम दिला आहे.
सरकारने आता जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर मोठा निर्णय घेतला आहे. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय़ मोठा दिलासादायक ठरणार आहे.
राज्य सरकारच्या मराठा समाजासाठी कार्यरत असलेल्या 'सारथी' संस्थेकडून परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेत महत्त्वाचे बदल केले गेले आहे.
मराठा समाजातील परदेशात शिक्षणासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार, शिष्यवृत्तीच्या लाभांवरील रकमेची मर्यादा संपुष्टात आणली आहे.
तसेच संबंधित मराठा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक संस्थेचे संपूर्ण शिक्षण शुल्क आता संबंधित यंत्रणेमार्फत थेट संस्थेला देण्यात येणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे.
फडणवीस सरकारनं ऐन जरांगेंचं आंदोलन तापलेलं असताना नव्या घोषणेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता यादीसाठी आता क्यूएस रँकिंग विचारात घेतली जाणार आहे.
जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू असताना सरकारकडून आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना पुस्तके, स्टेशनरी, प्रबंध तयार करणे, स्थानिक प्रवासासह इतर खर्चांसाठी दरवर्षी अमेरिका आणि इतर देशांसाठी 1500 अमेरिकन डॉलर आणि यु.के.साठी 1100 पौंड इतका निर्वाह आर्थिक तरतूद करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.