Rajanand More
कर्नाटकातील काँग्रेसचे आमदार बी. आर. पाटील अचानक चर्चेत आले आहेत. कालपासून त्यांच्याभोवतीच राज्यातील राजकारण फिरू लागले आहे.
आमदार पाटील हे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचे राजकीय सल्लागार होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पदाचा राजीनामा दिला आहे.
पाटील हे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी, मंत्रिपद न मिळणे, आदी कारणांमुळे नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे.
पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिल्याचे सांगताना पाटील यांनी आता राजीनामा मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आमदार पाटील यांच्या डोक्यावर नेहमी गांधी टोपी असते. असे पेहराव करणारे कर्नाटक विधिमंडळातील ते एकमेव आमदार आहेत. हीच त्यांची खासियत आहे.
पाटील हे सध्या काँग्रेसचे आमदार असले तरी यापूर्वी त्यांनी दोन-तीन पक्ष बदलले आहेत. असे असले तरी सध्या ते मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मानले जातात.
पहिल्यांदा जनता पार्टीच्या तिकीटावर 1983 मध्ये आमदार झाले. त्यानंतर जेडीएसमधून 2004 ची निवडणूक लढली. 2013 मध्ये पुन्हा जनता पार्टी आणि 2023 मध्ये काँग्रेसचा हात हाती घेतला.
पाटील यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसमधील गटबाजी आणि मंत्रिपदाच्या वाटपाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.