आमदार पाटील... घाव म्हणजी घाव म्हणजी घावच आसतुया!

Rajanand More

आमदार बी. आर. पाटील

कर्नाटकातील आळंद विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार बी. आर. पाटील. मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या विश्वासू मानले जातात.

MLA BR Patil | Sarkarnama

ऑडिओ क्लिप व्हायरल

पाटील यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यामध्ये ते लाच दिल्याशिवाय सरकारी योजनेतून लोकांना घरंं मिळत नसल्याचा दावा करत आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

MLA BR Patil | Sarkarnama

परखड

सरकारमधील चुकांवर परखड बोलणारे नेते म्हणूनही पाटील यांची ओळख आहे. सरकारसह ते स्वपक्षावरही सतत घाव घालत असतात. त्यामुळे त्यांची चर्चा होतच असते.

MLA BR Patil | Sarkarnama

सल्लागारपदाचा राजीनामा

पाटील यांनी फेब्रुवारी महिन्यातच मुख्यमंत्र्याच्या राजकीय सल्लागार पदाचा राजीनामा दिला होता. मंत्रिपद नसणे आणि पक्षातील कुरघोडींवर ते नाराज असल्याची चर्चा त्यावेळी होती.

MLA BR Patil | Sarkarnama

सध्या उपाध्यक्ष

कर्नाटक राज्य धोरण आणि नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपदाची जबाबदारी ते सध्या सांभाळत आहेत.  

MLA BR Patil | Sarkarnama

तिसरा पक्ष

पाटील हे पहिल्यांदा 1983 मध्ये जनता पक्षाच्या तिकीटावर आमदार झाले. त्यानंतर 2004 मध्ये जेडीएस, 2013 मध्ये पुन्हा जनता पक्ष आणि 2023 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करून आमदार झाले.

MLA BR Patil | Sarkarnama

डोक्यावर गांधी टोपी

डोक्यावर गांधी टोपी असलेले ते कर्नाटक विधानसभेतील एकमेव आमदार आहेत. गांधी टोपी परिधान करणाऱ्या देशातील मोजक्या राजकारण्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.

MLA BR Patil | Sarkarnama

काँग्रेस अडचणीत

पाटील यांची क्लिप व्हायरल झाल्याने आता काँग्रेस सरकार अडचणीत आले असून भाजपच्या हाती आयते कोलित मिळाले आहे.

MLA BR Patil | Sarkarnama

NEXT : शरद पवार अन् सुप्रिया सुळे यांना राहुल गांधींचा खास 'रिप्लाय'

येथे क्लिक करा.