सरकारनामा ब्यूरो
'आयपीएस' यतीश चंद्र केरळ केडरचे कार्यक्षम पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
केरळातील हिंसाचार आणि गुंडगिरीविरोधात खंबीरपणे लढणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
त्यांच्या लोकप्रियतेमुळे अशा अधिकाऱ्यांच्या मागणीसाठी अनेक मोहिमा राबवल्या गेल्या.
यतीश यांना प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखलं जातं.
ते मूळचे कर्नाटकातील दावणगिरी या जिल्ह्याचे आहेत.
शालेय शिक्षण पूर्ण करून बापूजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
कॅम्पस सिलेक्शन मधून कॉग्निझन्ट येथे काही काळ नोकरी केल्यावर त्यांनी आयपीएसची तयारी सुरू केली.
2010 मध्ये 211 वा रँक मिळवत यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली.
शाळेत असताना पोलिसांच्या शौर्यगाथा ऐकल्यामुळे त्यांनीही आयपीएस व्हायचं ठरवलं आणि स्वप्नं पूर्ण केलं.