सरकारनामा ब्यूरो
मिझोरमची विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली...
या निवडणुकीत मिझोरमच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला आमदार निवडून आल्या आहेत. वनेहसांगी या मिझोरमच्या सर्वात तरुण आमदार ठरल्या.
मिझोरम विधानसभा निवडणुकीत सर्वात तरुण महिला आमदार बेरिल वनेहसांगी यांनी आयझॉल दक्षिण-3 या मतदारसंघातून निवडणूक जिंकली.
वनेहसांगी यांनी शिलाँग येथील नॉर्थ ईस्टर्न हिल युनिव्हर्सिटीमधून कला शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
राजकारणात येण्याआधी त्या रेडिओ जॉकी होत्या. तसेच त्यांनी टिव्हीवर सूत्रसंचालन केले आहे.
सोशल मीडियावर त्या फार प्रसिद्ध आहेत. वनेहसांगी यांना सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.
मिझोरमच्या पारंपरिक धारणा आणि समाजरूढींना छेद देत त्यांनी निवडणूक जिंकत महिलांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
या खडतर प्रवासात त्यांना एक महिला म्हणून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. मात्र, मिझोरमच्या पहिल्या महिला आमदारांपैकी एक अशी ओळख मिळवली.