Pradeep Pendhare
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या परदेश दौऱ्यावर असून, ते न्यूझीलंड दौरा आटपून येत आहेत.
परदेश दौऱ्यांदरम्यान पंतप्रधान मोदी अनेकदा तिथल्या स्थानिक अन् प्रसिद्ध वस्तूंची खरेदी करतात.
पंतप्रधान परदेशात असताना खरेदी केलेल्या वस्तूंचे पेमेंट कसे करतात याची माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात खरेदी करताना कोणत्याही परदेशी क्रेडिट कार्डचा किंवा रोख रकमेचा वापर करत नाहीत.
पंतप्रधान मोदी भारताच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचा म्हणजेच 'रुपे' (RuPay) कार्ड आणि 'यूपीआय'चा वापर करतात.
भूतानच्या दौऱ्यात, पंतप्रधान मोदींनी हस्तशिल्प सामग्री खरेदी करताना 'RuPay' कार्ड स्वाइप करून पैसे दिले.
अबुधाबीत पंतप्रधान मोदी यांनी भारताचे UPI आणि UAEची 'AANI' पेमेंट सिस्टीम, एकमेकांशी जोडत 'लाईव्ह ट्रान्झॅक्शन' केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात स्वतः वस्तू खरेदी करून डिजिटल पेमेंट करण्यामागे एक खूप मोठी जागतिक रणनीती आहे.
परदेशात जाणाऱ्या भारतीय पर्यटकांनी चलन बदलण्याऐवजी भारताच्याच डिजिटल पेमेंट प्रणालीचा वापर करावा, असा संदेश पंतप्रधानांनी याद्वारे दिला.