Kartar Singh Tanwar : अरविंद केजरीवालांना तगडा झटका देणारे कर्तारसिंह तंवर आहेत तरी कोण?

Mayur Ratnaparkhe

आम आदमी पार्टी सोडलेले कर्तारसिंह तंवर हे दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत.

कर्तारसिंह हे नवी दिल्लीच्या छतरपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार आहेत.

मात्र आता तंवर यांनी आम आदमी पार्टी सोडत केजरीवाल यांना मोठा धक्का दिला आहे.

कर्तारसिंह तंवर यांच्याकडे 130 कोटी रुपयांची बेनामी संपत्ती उघड झाली आहे.

आयकर विभागाच्या छाप्यात त्यांच्या 20 कंपन्या सापडल्या आहेत.

तंवर यांचे घर, कार्यालय आणि फार्महाऊस व्यतिरिक्त 11 ठिकाणी छापेमारी झाली होती.

तंवर आणि त्याच्या भावाकडून एक कोटी रुपयांच्या रोख रकमेशिवाय दागिनेही जप्त करण्यात आले आहेत.

आम आदमी पार्टीत प्रवेश करण्यापूर्वी कर्तारसिंह तंवर हे भाजपचे नगरसेवक होते.

कर्तारसिंह तंवर यांनी दिल्लीत दोनदा विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत.

Next : चमकोगिरी करणाऱ्या IAS पूजा खेडकर यांना रुबाब नडला

Pooja Khedkar | Sarkarnama