Mangesh Mahale
पूजा खेडकर या २०२३ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत.
जून महिन्यात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून त्यांची पुण्यामध्ये नियुक्ती झाली होती.
चमकोगिरी केल्याने त्या वादात सापडल्या त्यांची वाशिममध्ये बदली करण्यात आली.
त्या माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत.
पुणे जिल्ह्यात रुजू होण्यापूर्वीच निवासस्थान, कार आणि शिपाई यांच्याबाबत प्रशासनाकडे त्यांनी मागणी केली होती.
पूजा यांना स्वतंत्र कक्ष असणारी बैठक व्यवस्था उपलब्ध करुन दिली होती, कक्षाला बाथरुम अटॅच नसल्याने त्यांनी ती नाकारली.
खनिजकर्म शाखेजवळ अटॅच्ड बाथरुम असलेलं व्हिआयपी सभागृह शोधलं त्याठिकाणी त्यांनी आसन व्यवस्थेची मागणी केली.
पूजा खेडकर यांनी अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्या चेंबरवर 'कब्जा'केला होता.
ऑडी कारवर 'महाराष्ट्र शासन' असं स्टिकर लावलं होते, खासगी कारला सरकारी दिवा लावता येत नाही, त्यांनी लाल दिवा लावला होता.
NEXT: तेलगी, समृद्धी अन्...; 'या' प्रकरणांमुळे राधेश्याम मोपलवार आलेले चर्चेत