Rashmi Mane
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सेंट्रल विस्टा प्रकल्पांतर्गत बांधलेल्या कर्तव्य भवन-3 चे उद्घाटन झाले. ही आधुनिक सुविधांनी परिपूर्ण इमारत आहे, जिथे केंद्र सरकारचे विविध मंत्रालय एकत्रितपणे असणार आहेत.
सेंट्रल विस्टा प्रकल्पाअंतर्गत 10 नवे प्रशासकीय भवनं बांधली जात आहेत. यातील तीन भवनांचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित 7 इमारती 2027 पर्यंत पूर्ण होणार आहेत.
हे भवन 1.5 लाख वर्ग मीटर क्षेत्रफळात उभारण्यात आले आहे. ही अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी इमारत आहे. हे कर्तव्य पथाच्या दोन्ही बाजूंना विस्तारलेले आहे.
भवनात 24 मोठे कॉन्फरन्स हॉल तर 26 लहान हॉल आणि 67 मीटिंग रूम्स आहेत.
भवनात एकाच वेळी 600 गाड्यांसाठी पार्किंगची सोय आहे. तसेच योगा रूम, क्रेच, मेडिकल रूम, कॅफे आणि मल्टीपर्पज हॉल यांचा समावेश आहे.
ही इमारत 5.34 लाख सोलर पॅनल्सने सज्ज आहे, जी ऊर्जा बचतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
भवनात 27 लिफ्ट्स, 27 सेंट्रलाइज ए.सी. यंत्रणा, 2 स्वयंचलित जिने आणि एक अद्ययावत CCTV नियंत्रण केंद्रही तयार करण्यात आले आहे.
2027 पर्यंत उर्वरित 7 इमारती पूर्ण होतील. कृषी भवन, शास्त्री भवन, उद्योग भवन आणि निर्माण भवन यांना पाडून नवीन जागा मंत्रालयांना दिली जाईल. मंत्रालयांचे स्थलांतर सुरू झाले आहे.