सरकारनामा ब्यूरो
एक असा क्रिकेटर आहे जो त्याच्या करिअरमध्ये यशस्वी असतानाही आयपीएस होण्यासाठी ते सोडले. कार्तिक मधिरा हे मेहनत आणि जिद्दीच्या बळावर IPS बनले.
'आयपीएस' कार्तिक मधिरा हे मुळचे हैदराबादचे रहिवासी असून त्यांनी जवाहरलाल नेहरू टेक्निकल युनिव्हर्सिटी (JNTU) मधून कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे.
मधिरा यांनी 13,15,17, वर्षांखालील आणि 19 च्या अंडर गटातील अनेक राज्य पातळीवर खेळाडू म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
त्यांना क्रिकेट करिअरमध्ये चांगले यश मिळाले होते, मात्र क्रिकेट खेळताना शारीरिक दुखापत झाल्याने त्यांना क्रिकेट सोडावे लागले.
लहानपणापासून त्यांना देश सेवा करण्याची इच्छा होती. क्रिकेट सोडल्यानंतर त्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवत UPSC परीक्षेची तयारी सुरु केली.
पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली त्यावेळी काही गुण कमी पडल्याने ते परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. यानंतर कार्तिक यांना सलग दोनदा अपयशाचा सामना करावा लागला.
हार न मानता त्यांनी चौथ्या प्रयत्नात 2019 ला UPSC परीक्षा उत्तीर्ण करत 103 वी रँक मिळवली.
रँकनुसार त्यांची नेमणूक IPS अधिकारी म्हणून करण्यात आली असून, सध्या कार्तिक मधिरा लोणावळा येथे सहाय्यक पोलिस अधिक्षक (एएसपी) म्हणून कार्यरत आहेत.