Rajanand More
वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप होत आहे. त्यांच्यावर दिल्लीत गुन्हाही दाखल आहे.
कार्तिक कंसल यांनी एकदा नव्हे तब्बल चारवेळा UPSC पास होऊनही त्यांना IAS पोस्ट नाकारण्यात आली आहे. ते दिव्यांग आहेत.
कार्तिक यांना मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा आजार आहे. आयएएसच्या पात्रता निकषांमध्ये या आजाराचा समावेश नसल्याचे कारण देण्यात आले आहे.
कार्तिक कंसल भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत वैज्ञानिक म्हणून काम करतात. ते वयाच्या चौदाव्या वर्षापासून आजारामुळे व्हिलचेअर वापरतात.
कार्तिक यांनी 2019 (रँक 813), 2021 (रँक 271), 2022 (रँक 784), 2022 (रँक 819) अशी चारवेळा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
2021 मध्ये 271 वी रँक मिळाल्याने कार्तिक दिव्यांग कोट्याचा फायदा न घेताही आयएएस बनू शकले असते. पण आजाराचे कारण पुढे करून पोस्ट नाकारली.
कार्तिक यांनी भारतीय महसूल सेवेला दुसरे प्राधान्य दिले होते. पण एम्सच्या मेडिकल बोर्डाने त्यांच्या मांसपेशी कमकूवत असल्याने मान्यता दिली नाही.
कार्तिक हे प्रशासकीय सेवेसाठी सक्षम नसल्याचे सांगत बोर्डाने त्यांना 90 टक्के दिव्यांग ठरवले आहे. त्यांनी सेंट्रल अडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्यूनलमध्ये याविरोधात दाद मागितली आहे.