Ganesh Sonawane
कशिश मित्तल यांनी 2006 मध्ये JEE परीक्षेत संपूर्ण भारतात 6 वा क्रमांक मिळवला. त्यांनी IIT दिल्ली येथून संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले.
IIT नंतर त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी सुरू केली. 2011 मध्ये अवघ्या 21 व्या वर्षी UPSC मध्ये 58 वी रँक मिळवली.
UPSC यशानंतर त्यांना AGMUT कॅडरची नेमणूक मिळाली. अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोरम व केंद्रशासित प्रदेशात त्यांनी काम केले.
काही वर्षे अधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यांचा हा निर्णय चर्चेचा विषय ठरला.
IAS सोडल्यानंतर त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये Principal Research Program Manager म्हणून ५ वर्षे काम केले.
2025 मध्ये त्यांनी मायक्रोसॉफ्टची नोकरीही सोडली. यानंतर ‘दिशा AI’ नावाचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअप सुरू केले.
कशिश मित्तल हे उत्तम गायकही आहेत. त्यांना हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची उत्तम जाण आहे. आपली आवड जोपासता यावी म्हणून त्यांनी नोकरी सोडून गायक म्हणून नवी वाट धरली आहे.
त्यांच्या गाण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. इंस्टाग्रामवर त्यांचे 80 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.