ग्लॅमरने केला वर्दीचा घात; खुद्द मुख्यमंत्र्यांनीच काढले महिला DSP च्या निलंबनाचे आदेश

Rajanand More

नेहा पच्चीसिया

मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील DSP नेहा पच्चीसिया यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. खुद्द मुख्यमंत्री मोहन यादव यांनीच निलंबनाचे आदेश दिले आहे.

DSP Neha Pachisiya | Sarkarnama

नेमकं काय घडलं?

नेहा पच्चीसिया यांच्यासह अन्य दोघांवर फसवणूक, दबाव टाकणे आणि गुन्हेगारी संगनमताच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्‍यांनी निलंबनाचे आदेश दिले.

DSP Neha Pachisiya | Sarkarnama

जमिनी विक्रीचे प्रकरण

तक्रारदाराच्या आरोपानुसार, आपल्या वडिलांवर दबाव टाकून जमीन कमी किंमतीत विकण्यास भाग पाडले. यामध्ये सुमारे 1.07 कोटी रुपयांचा व्यवहार ठरल्याचा दावा करण्यात आला आहे.

DSP Neha Pachisiya | Sarkarnama

कमी किंमतीत व्यवहार

दबावाखाली जमिनीची नोंदणी केवळ सुमारे 18.20 लाख रुपयांत करण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे सरकारी दरानुसार संबंधित जमिनीची किंमत सुमारे 82.86 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

DSP Neha Pachisiya | Sarkarnama

पैसे दिले नाहीत

आरोपींनी व्यवहारानंतर केवळ 15 लाख रुपयांचा धनादेश आणि 3.20 लाख रुपये रोख दिले. मात्र उर्वरित रक्कम देण्यात आली नसल्याचा आरोप.

DSP Neha Pachisiya | Sarkarnama

यापूर्वी आरोप

एका वाहतुकदाराने यापूर्वी नेहा पच्चीसिया यांच्यावर 25 हजार रुपयांच्या खंडणीचा आरोप केला होता. हे प्रकरणही त्यावेळी गाजले होते.

DSP Neha Pachisiya | Sarkarnama

एअर होस्टेस

नेहा या पोलीस सेवेत येण्यापूर्वी एअर होस्टेस म्हणून काम करत होत्या. या नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या पोलीस अधिकारी बनल्या आहेत.

DSP Neha Pachisiya | Sarkarnama

ग्लॅमर

एअर होस्टेस असल्यापासून नेहा यांना ग्लॅमरचे आकर्षण होते. त्यामुळे पोलीस अधिकारी झाल्यानंतर त्यांचा वापर तसाच होतो. त्यावरूनही त्या सतत चर्चेत असायच्या. यानेच त्यांचा घात केल्याची चर्चा आहे.

DSP Neha Pachisiya | Sarkarnama

NEXT : तुमचे वडील, आजोबा आले तरी मीच आमदार होणार! महिला नेत्याचे थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान

येथे क्लिक करा.