तुमचे वडील, आजोबा आले तरी मीच आमदार होणार! महिला नेत्याचे थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान

Rajanand More

बंडखोरी

तेलंगणा काँग्रेसमधील अंतर्गत बंडखोरी आता चव्हाट्यावर आली आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर त्यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री कोंडा सुरेखा यांच्या कन्या कोंडा सुष्मिता यांनी जाहीरपणे टीका करत थेट आव्हान दिले आहे.

Revanth Reddy | Sarkarnama

कोंडा सुष्मिता

कोंडा सुष्मिता या पारकल मतदारसंघातून काँग्रेसचे तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. निवडणुकीची तयारीही त्यांनी सुरू केली आहे. या मतदारसंघातील विद्यमान आमदार काँग्रेसचेच आहेत.

Konda Susmita Patel | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांना आव्हान

पारकल मतदारसंघात आईच्या वाढदिवासानिमित्त झालेल्या कार्यक्रमात बोलताना सुष्मिता यांनी थेट मुख्यमंत्र्‍यांनी आमदार रेवुरी प्रकाश रेड्डी यांना दिलेल्या पाठिंब्याला विरोध केला. तसेच त्यांच्या अधिकारावरही प्रश्न केला.

Konda Susmita Patel | Sarkarnama

वडील,आजोबा आले तरी...

मुख्यमंत्र्‍यांवर टीका करताना सुष्मिता या थेट मुख्यमंत्र्‍यांचे वडील, आजोबांपर्यंत गेल्या. तुम्ही, तुमचे वडील किंवा आजोबा आले तरी पारकलची आमदार मीच होणार, असे खुले आव्हान त्यांनी दिले आहे.

Konda Susmita Patel | Sarkarnama

भावाचा घोटाळा

सुष्मिता यांनी मुख्यमंत्र्यांच्या भावावर कथित २०० कोटी रुपयांच्या जमीन व्यवहाराचा आरोपही केला. तसेच रेवंत रेड्डी यांच्या कुटुंबाशी संबंधित इतर कथित गैरव्यवहारही उघड करण्याचा इशारा दिला आहे.

Konda Susmita Patel | Sarkarnama

अपक्ष

काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यास अपक्ष म्हणून याच मतदारसंघातून निवढणूक लढण्याची तयारीही सुष्मिता यांनी दाखविली. त्यामुळे काँग्रेस समोरील संकट वाढले आहे.

Konda Susmita Patel | Sarkarnama

बालेकिल्ला

वारंगल जिल्हा हा कोंडा कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. सुष्मिता यांच्या आई सुरेखा या वारंगल पूर्ण विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. अन्य मतदारसंघांवरही या कुटुंबाचा प्रभाव आहे.

Konda Surekha with Sonia Gandhi | Sarkarnama

वडील माजी आमदार

सुष्मिता यांचे वडील मुरलीधर राव हे विधानपरिषदेचे माजी आमदार आहेत. त्यांच्याकडून सातत्याने मुलीच्या तिकीटासाठी फिल्डींग लावली जात असून उघडपणे काँग्रेस आमदारांवर टीका केली जात आहे.

Konda Susmita Patel | Sarkarnama

NEXT : CM विजय यांच्यासाठी थेट विधानसभेत गायलं गाणं; 'या' महिला आमदार सोशल मीडियात 'हिट'...

येथे क्लिक करा.