2.3 अब्ज डॉलर्सची संपत्ती, काका राजकारणी; IPLमधील हैदराबाद टीमच्या मालकीणबाई काव्या मारनला आहे 'या' गोष्टीचं प्रचंड आकर्षण

Deepak Kulkarni

काव्या मारन या नावाची प्रचंड चर्चा

आयपीएलच्या मॅचेस सुरू झाल्या की, काव्या मारन या नावाची प्रचंड चर्चा होते. या नावाभोवती मोठं ग्लॅमर निर्माण झालं आहे. 2018 पासून काव्या आणि आयपीएल असं एक समीकरण जुळलं आहे.

Kavya Maran | Sarkarnama

सनरायझर्स हैदराबादची मालकीणबाई...

काव्या ही केवळ क्रिकेट जगतातील एक प्रसिद्ध व्यक्ती नाही, तर 2018 पासून सनरायझर्स हैदराबाद या आयपीएलमधील क्रिकेटची टीमची सीईओ आणि सह-मालक देखील आहे.

Kavya Maran | Sarkarnama

लिलावापासून टीमच्या प्रत्येक निर्णयात लक्ष

ती आपल्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी अनेकदा स्टेडिअममध्ये हजर असते. तसेच आयपीएलमधील खेळाडूंच्या लिलावापासून टीमबाबत प्रत्येक निर्णयात तिचं बारकाईनं लक्ष असतं.

Kavya Maran | Sarkarnama

मारन कुटुंबाची अंदाजे संपत्ती

भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक असूनही, प्रसिध्द उद्योजक कलानिधी मारन आणि कावेरी मारन यांची मुलगी असलेल्या काव्यानं वैयक्तिक 409 कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती निर्माण केली आहे. मारन कुटुंबाची एकत्रित एकूण संपत्ती अंदाजे 2.3 अब्ज डॉलर्स इतकी असल्याचं बोलले जाते.

Kavya Maran | Sarkarnama

प्रचंड फॅन फॉलोईंग

मॅचदरम्यानचा तिचा उत्साह आणि टीमसाठीचा सपोर्ट त्यामुळे तिची क्रेझ अवघी आयपीएल पुरतीच मर्यादित राहिलेली नसून क्रिकेट जगताबाहेरही तिला प्रचंड फॅन फॉलोईंग असल्याचं दिसून येतं.

Kavya Maran | Sarkarnama

कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी

काव्याला कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमीदेखील आहे. तिचे काका हे प्रसिध्द राजकारणी दयानिधी मारन हे आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच काव्याची जीवनशैली ही रॉयल असते.

Kavya Maran | Sarkarnama

शिक्षण

काव्याने चेन्नईतील स्टेला मॅरिस कॉलेजमधून पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केले. आणि त्यानंतर तिने यूकेमधील वॉरविक बिझनेस स्कूलमधून एमबीएची पदवी मिळवली आहे.

Kavya Maran | Sarkarnama

आलिशान कारबद्दल प्रचंड आकर्षण

मिळालेल्या माहितीनुसार, काव्याला आलिशान कारबद्दल प्रचंड आकर्षण आहे. तिच्याकडे लक्झरी कारचा मोठा संग्रह असल्याचीही माहिती आहे. जो तिच्या श्रीमंतचं प्रतीक आहे.

Kavya Maran | Sarkarnama

व्यवसायाशी असलेली बॉण्डिंग कौतुकास्पद

काव्याच्या नेतृत्वाखाली 2018 पासून हैदराबाद सनरायझर्सच्या कामगिरीचा आलेख उल्लेखनीय राहिलेला आहे. क्रिकेटबद्दलची तिची आत्मीयता ,झोकून देत काम करण्याची पध्दती तसेच व्यवसायाशी असलेली बॉण्डिंग कौतुकास्पद अशीच आहे.

Kavya Maran | Sarkarnama

NEXT UPSC टॉपर की सुपरमॉडेल? फोटोने इंटरनेटवर घातलाय धुमाकूळ!

Poorva-Chaudhary | Sarkarnama
येथे क्लिक करा...