सरकारनामा ब्यूरो
दिल्लीच्या IPS मोहिता शर्मा या KBC 'कौन बनेगा करोडपती'च्या विजेत्या आहेत.
मोहिता या मूळच्या हिमाचल प्रदेश येथील कांगडाच्या आहेत.
दिल्लीतील द्वारका डीपीएसमधून शालेय शिक्षण, भारती विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले.
बीटेक केल्यानंतर त्यांनी लगेच यूपीएससीची तयारी सुरू केली होती.
पाचव्या प्रयत्नात यश मिळवत त्या आयपीएस अधिकारी झाल्या.
सुरुवातीला त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगात काम केले.
2017 बॅचच्या आयपीएस अधिकारी मोहिता या सध्या जम्मू-काश्मीरमध्ये तैनात आहेत.
'कौन बनेगा करोडपती'मध्ये त्यांनी 1 कोटी रुपयांच्या प्रश्नाचे अचूक उत्तर दिले आणि त्यानंतर त्या सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झाल्या