Deepak Kulkarni
भाजप, काँग्रेससह सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.
लवकरच देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत यंदा 96 कोटी मतदार आपल्या आवडीचे सरकार निवडणार आहे.
एकूण मतदारांमध्ये तरुणाईचा व नवमतदारांचा टक्का मोठा आहे.
याच मतांची संख्या सर्वच राजकीय पक्षांसाठी निर्णायक ठरणार आहे.
देशभरात नोंदणीकृत असलेल्या या मतदारांमध्ये 47 कोटी महिला मतदार आहेत.
गेल्या पाच वर्षात वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांची संख्या देशभरात मोठी आहे.
यापैकी निम्म्यावर मतदार प्रथम आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
18 ते 45 वयोगटातील मतदारांची संख्या सर्वाधिक असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
महिलांचे मतदान कोणाला झुकते माप देते यावरही भाजप, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांचे यश-अपयश अवलंबून राहणार आहे.
गेल्या काही वर्षात सत्ताधारी भाजपने महिलांसाठी अनेक योजना लागू केल्याचे सांगण्यात येत आहे.
NEXT : उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरेंचा वंदे भारतने प्रवास, पहा फोटो