Aslam Shanedivan
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय क्विझ शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' हा शो गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.
या शोच्या ज्युनिअर 'कौन बनेगा करोडपती'मध्ये 2001साली एका चिमुकल्याने सहभाग घेतला होता.
त्या 14 वर्षांच्या मुलाने 'कौन बनेगा करोडपती'त त्यावेळी 1 करोड जिंकले होते. तर महानायक अमिताब बच्चन यांनी कौतुक करत त्याला ती रक्कमेचा चेक दिला होता.
1 करोड जिंकले म्हणून आयशो आराम न करता त्याने कठोर मेहनत करत तो आज आयपीएस अधिकारी झाला आहे. त्याचे नाव रवि मोहन सैनी.
रवी मोहन सैनी लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होते. त्यांनी 12 नंतर वैद्यकीय शिक्षण घेतले. ते डॉक्टर झाले. पण डॉक्टर पेक्षा न स्विकारता त्यांनी यूपीएससीचा मार्ग अवलंबला. कोणतेही कोचिंग न घेता 2014 मध्ये, त्यांनी यूपीएससी क्रॅक केली. ते 461 व्या क्रमांकासह आयपीएस झाले.
आता ते गुजरातमधील राजकोट शहरातील डीसीपी-झोन 1 चे एसपी असून त्याचे वडील नौदलात अधिकारी होते.
रवी मोहन सैनी यांनी अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या 15 कठीण प्रश्नांची उत्तरे अचूक दिली होती.