Ganesh Sonawane
कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी (माधुरी) हत्तीणीला आता गुजरातमधील जामनगर येथे असलेल्या वनतारा वन्यजीव पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले आहे.
महादेवी हत्तिणीची कोल्हापूरला पुन्हा रवानगी करण्याचे कोणतेही आदेश नाही. पण, वनतारा प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की, न्यायालीय व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यास आम्ही सहकार्य करु.
वनताराने माधुरीला पुन्हा कोल्हापूरला पाठवण्याचे संकेत दिले असले तरी मात्र, त्यासाठी काही बाबींची पूर्तता करणे आवश्यक असणार आहे.
त्यासाठी आवश्यक अशा अधिकृत वन्यजीव खात्याने तसेच जैन मठाने न्यायालयात कायदेशीर याचिका दाखल केली पाहीजे.
वन्यजीव संरक्षण कायदा व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्राण्यांच्या वाहतुकीचे सर्व नियमांचे पालन करण्यात आले पाहीजे.
जर आणि जेव्हा न्यायालयाने तसा आदेश दिला, तर महादेवी हत्तिणीला वैद्यकीय देखरेखीखाली आणि तज्ज्ञ वन्यजीवांच्या हाताळणीत सुरक्षितरीत्या आणि प्रतिष्ठेने पुन्हा कोल्हापूरला पाठवण्याची वनताराची तयारी आहे.
उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात नमूद केल्यानुसार महादेवी (माधुरी) या हत्तिणीचे हित जोपासणे हे प्रमुख उद्दिष्ट वनताराचे यामागे आहे.
कायदेशीर उत्तरदायित्व, जबाबदारी आणि पारदर्शकता यांचे पालन करणे. यात महादेवी हत्तिणीच्या प्रकृतीचे संपूर्ण वैद्यकीय अहवाल आणि तटस्थ निरीक्षकांचे पाहणी अहवाल यांचा समावेश आहे.