Rashmi Mane
ब्रिटनमध्ये उद्या म्हणजेच ४ जुलै रोजी मतदान होणार आहे.
या निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे ऋषी सुनक आणि लेबर पक्षाचे किअर स्टारमर यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. किअर स्टारमर हे डाव्या विचारसरणीच्या लेबर पार्टी पक्षाचे नेते आहेत.
61 वर्षीय किअर स्टारमर हे व्यवसायाने वकील असून इंग्लंड आणि वेल्सचे माजी मुख्य वकील होते.
किअर स्टारमर यांनी 2015 मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि सध्या ते 'लेबर पक्षा'चे नेते आहेत.
सर्वेक्षणानुसार, सध्या संपूर्ण ब्रिटनमध्ये किअर स्टारमर यांना प्रचंड लोकप्रियता आहे.
किअर स्टारमर यांचा जन्म 2 सप्टेंबर 1962 ला ऑक्स्टेड येथे झाला.
किअर स्टारमर यांनी रेगेट ग्रामर स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे त्यांच्या कुटुंबातून विद्यापीठात शिक्षणासाठी जाणारे ते त्यांच्या कुटुंबातील पहिले होते. त्यानंतर त्यांनी लीड्स विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेतले.