Rajanand More
शारदा मुरलीधरन या 1990 च्या तुकडीच्या आएएस अधिकारी आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी केरळच्या मुख्य सचिव म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.
शारदा यांनी त्यांचे पती डी वेणू यांच्याकडून मुख्य सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला. पतीकडून पत्नीकडे सर्वोच्च मुख्य सचिवपद येण्याची ही ऐतिहासिक घटना आहे. सप्टेंबर 2024 पासून त्या सचिव आहेत.
केरळ राज्याच्या प्रशासनातील अनेक महत्वाच्या पदांवर काम करत शारदा यांनी आपला ठसा उमटवला आहे. अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत.
शारदा मुरलीधरन यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्याला काळ्या रंगावरून टार्गेट केले जात असल्याचा एक अनुभव सांगितला आहे.
मी तेवढीच काळी आहे, जेवढा माझ्या पतीचा रंग गोरा होता, अशी टीका एका व्यक्तीने केल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. ही कमेंट शारदा यांच्या चांगलीच मनाला लागली.
शारदा यांनी फेसबुकवर पोस्ट करत टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे. हा रंग एक विश्वव्यापी सत्य आहे. मानवजातीला ज्ञात असलेली सर्वात शक्तीशाली ऊर्जा आहे, असे शारदा यांनी म्हटले आहे.
माझा रंग चांगला नाही, ही गोष्ट माझ्या मनावर 50 वर्षांहून अधिक काळापासून ठसवली जात असल्याचेही शारदा यांनी पोस्टमध्ये म्हटले होते. त्यांनी आपल्या भावना मोकळेपणाने पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत.
शारदा यांनी ही पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियात त्यांना अनेकांनी पाठिंबा दिला आहे. वर्णभेदी टिप्पणीवरून चर्चांना उधाण आले आहे.