Roshan More
केरळमध्ये काँग्रेस आघाडीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांनी मोठा निर्णय घेतला.
केरळ सरकारने AI (Artificial Intelligence) मंत्रालय स्थापन केले आहे.
पी. के. कुन्हालीकुट्टी या मंत्र्याकडे या मंत्रालयाची जबाबदारी असेल.
या मंत्रालयाद्वारे प्रशासनात डिजिटल बदल घडवण्यात येणार आहेत.
डेटा आधारित निर्णयप्रक्रिया, स्मार्ट प्रशासन, डिजिटल सेवा वाढवणे, रोजगारनिर्मिती आदी उदिष्टे या मंत्रालयाची असणार आहेत.
डिजिटल अर्थव्यवस्थेकडे सरकारने हे मोठे पाऊल टाकल्याचे मानले जाते आहे.
एआय खाते तयार करून त्याची जबाबदारी मंत्र्याकडे देणारे केरळ हे पहिलेच राज्य ठरले आहे.