सरकारनामा ब्यूरो
मंगळवारी (ता.24) केंद्राने केरळ राज्याच्या ‘केरळम’ हे नामकरण करण्यास मान्यता दिली. अनेक वर्षांपासून केरळ सरकारने ही नामकरणाची मागणी लावून धरली होती. अखेर ही मागणी पूर्ण झाली आहे.
यापूर्वी 2023 आणि 2024 मध्ये केरळ विधानसभेत केंद्र सरकारला संविधानात सुधारणा करून राज्याचे नाव केरळ वरून ‘केरळम’ असे बदलण्याची विनंती करणारे ठराव मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी मांडले होते.
24 जुन 2024 च्या ठरावात.. मल्याळम भाषेत राज्याचे नाव ‘केरळम’ आहे. 1 नोव्हेंबर 1956 रोजी राज्यांची भाषिक आधारावर पुनर्रचना करण्यात आले, संविधानाच्या पहिल्या अनुसूचीमध्ये त्याचे नाव ‘केरळ’ आहे.
केरळ विधानसभेने एकमताने केंद्र सरकारला हे नाव ‘केरळम’ करण्यासाठी संविधानाच्या कलम 3 अंतर्गत त्वरित पावले उचलण्याची विनंती केली होती. त्यावर मंगळवारी (ता. 24) निर्णय झाला आहे. तरी नावाचा इतिहास समजून घेऊया.
केरळची मूळ भाषा मल्याळम असल्याने लोक 'केरळम' असच म्हणतात. इंग्रजीमध्ये 'केरला' असे म्हणतात. परंतु आता अधिकृत राज्याचे नावही मल्याळममध्ये असावं असा आग्रह होत होता.
पौराणिक कथेनुसार भगवान परशुरामांनी समुद्रातून भूमी काढली होती, 'केर' म्हणजे जल आणि 'अलम' म्हणजे भूमी अर्थात पाण्यातून निघालेली भूमी म्हणून 'केरळम'
तिसऱ्या शताब्दीमध्ये इ.स पुर्व सम्राट अशोक यांच्या शिलालेखात 'केरलपुत्र' शब्द उल्लेख आढळतो. हे नाव 2000 वर्ष जुने मानले जाते.
इतिहासकारांच्या मते चेरालम वरूण केरलम शब्द विकसित झाला आहे. दक्षिण भारतीय भाषांमध्ये 'च' आणि 'क' अक्षरांच्या उच्चार जवळपास सारखे असल्याने अपभ्रंश झाला.
'केरा' म्हणजे नारळ तर 'आलम' म्हणजे स्थान अशाप्रकारे केरळ नावाचा अर्थ होतो नारळांची भूमी.. परंतू याला ऐतिहासिक प्रमाण, संदर्भ नसल्याचे बोलले जाते.
पश्चिम घाटाचा उतार (चराल) समुद्र आणि पर्वत यांच्या दरम्यान वसलेला प्रदेश म्हणजे ‘चराल - चेलम - केरलम’ अशाप्रकारे केरळम शब्दाच्या उत्पत्तीचा हा देखील एक संभाव्य आधार मानला जातो.