Rajanand More
केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला राजधानी तिरूवनंतपुरम महापालिकेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळाला आहे. या पालिकेत पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकला आहे.
विजयाची मोदींनीही दखल घेत कार्यकर्ते, नेत्यांना शुभेच्छा दिल्या आहे. ही परिवर्तनाची सुरूवात असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या गोटात उमटत आहे.
तिरुवनंतपुरमध्ये भाजपचा पहिला महापौर म्हणून एका महिलेला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. ही महिला म्हणजे आर. श्रीलेखा या आहेत.
श्रीलेखा या केरळमधील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहे. त्यांनी राज्याच्या पहिल्या महिला डीजीपी म्हणूनही काम केले आहेत. निवृत्तीनंतर काही वर्षांनी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आहे. भाजपचे १०१ पैकी ५० नगरसेवक निवडून आले आहेत.
सेवेत कार्यरत असताना एक डॅशिंग महिला पोलिस अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या सेवेबद्दल त्यांना २०१३ मध्ये राष्ट्रपती पोलीस पदकही मिळाले आहे.
मागीलवर्षीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तेव्हापासून त्या राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. त्यांना या वर्षाच्या सुरूवातीला पक्षाचे प्रदेश उपाध्यक्षपद देण्यात आले आहे.
श्रीलेखा यांचा राज्यात आदरपूर्वक दरारा आहे. त्याच प्रतिमेचा फायदा घेण्याची रणनीती भाजपने आखली होती. ती यशस्वी ठरली. त्यामुळेच श्रीलेखा महापौर पदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.