Amol Sutar
भारतीय लोक आळशी असल्याचे काँग्रेसचे नेते पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांना वाटत होते. या मानसिकतेमुळे देशाचे मोठे नुकसान झाले, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काँग्रेसवर घणाघाती टीका केली.
प्रत्येक योजनेला आतापर्यंत काँग्रेसने मोठा विरोध केला आहे. काँग्रेसच्या वेगाने विकास केला असता तर विकास करण्यासाठी 100 वर्ष लागली असती, असे त्यांनी सांगितले.
काँग्रेसने लोकसभा निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास गमावला आहे. मागच्या वेळी अनेक लोकांनी मतदारसंघ बदलला होता. यावेळी देखील मतदारसंघ बदलण्याचा विचार करत आहेत.
आम्ही 17 कोटींहून अधिक गॅस कनेक्शन दिली. जर काँग्रेसच्या वेगानं गेलो असतो तर 60 वर्षे लागली असती, असे ते म्हणाले.
देशातील 80 कोटी नागरिकांना आमच्या सरकारने धान्य पुरवठा केला आहे. त्यामुळे कोणीही उपाशी राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येणार आहे. आज आपण पाचव्या क्रमांकावर पोचलो आहोत. 2014 मध्ये सत्तेत येण्यापूर्वी जगात अकराव्या स्थानावर होतो.
आमच्या कारकिर्दीत गरिबांसाठी आम्ही 4 कोटी नागरिकांना पक्की घरे दिली असल्याचे मोदींनी सभागृहात सांगितले.
देशातील घराणेशाहीचा फायदा काँग्रेसने घेतला. मल्लिकार्जुन खरगे हे एका सभागृहातून दुसऱ्या सभागृहात गेले. गुलाब नबी आजाद यांनी पक्षाला रामराम केला. घराणेशाहीमुळे हे सर्व झाले.
पक्षाचे सर्व निर्णय कुटुंबाकडून घेतले जातात, त्याला घराणेशाहीला म्हणतात. राजनाथ सिंह, अमित शहा कोणीही पक्ष चालवत नाही.