सरकारनामा ब्यूरो
दर्पण या UPSC नागरी सेवा परीक्षेच्या दुसऱ्याच प्रयत्नात यशस्वी झाल्या होत्या.
दर्पण या मूळच्या पंजाबमधील मोहालीच्या आहेत आणि पटियालाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएस पूर्ण केले.
प्रशिक्षणा दरम्यान टॉपर असलेल्या दर्पण यांनी UPSC परीक्षेच्या दुसऱ्याच प्रयत्नात 80 व्या रँकसह यश मिळवले.
सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी (SVPNPA) येथील पासिंग आऊट परेडचे त्यांनी नेतृत्व केले होते.
अशा प्रकारचे नेतृत्व करणाऱ्या त्या सहाव्या महिला IPS अधिकारी ठरल्या.
पंजाब केडरमधील दर्पण या IPS 73RR च्या अधिकारी आहेत.
महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरबद्दल जनजागृती करण्यासाठी त्या एक संस्थाही चालवतात.
पदवी पूर्ण करण्यापूर्वीच त्यांनी महिलांसाठी एक एनजीओ सुरू केली होती, आणि पिंक लिंक मोहिमेच्या मदतीने अनेक शिबिरे आयोजित केली.