Rajanand More
बिहारची राजधानी पटना येथील प्रसिध्द शिक्षक खान सर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी आपण गुपचूप लग्न केल्याचे जाहीर केले आहे.
भारत-पाकिस्तान संघर्ष सुरू असताना त्यांनी 7 मेला लग्न केल्याचे ऑनलाईन कोचिंग क्लासमध्ये सांगितले आहे. हा व्हिडीओ त्यांच्या यूट्युब चॅनेलवर आल्यानंतर लग्नाचा खुलासा झाला आहे.
खान सरांनी ए. एस. खान नावाच्या युवतीसोबत लग्न केल्याचे सांगितले जात आहे. ती बिहारमधीलच असून लग्नाला केवळ कुटुंबातील सदस्यच उपस्थित होते.
खान सर म्हणजेच फैजल खान. सोशल मीडियात खान सर नावाने अत्यंत प्रसिध्द असून यू ट्यूबवर त्यांच्या खान जीएस रिसर्च सेंटरचे जवळपास 25 लाख फॉलोअर्स आहेत.
खान सरांकडून विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केले जाते. त्यांची शिकविण्याच्या पध्दतीमुळे ते विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत.
खान सरांचे पटनाप्रमाणेच उत्तर प्रदेश आणि उतर काही ठिकाणीही क्लासेस आहेत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांसाठी त्यांचा क्लास प्रसिध्द आहे.
खान सर स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करत असले तरी त्यांनी एकदाही यूपीएससीची परीक्षा दिली नाही. मात्र, आज त्यांच्या क्लासमध्ये शिकून IAS-IPS किंवा अन्य पदांवर गेलेले अधिकारी त्यांच्या पाया पडतात.
बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते खान सरांना काही दिवसांपूर्वीच ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज बिहार पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे.