Pradeep Pendhare
पाकिस्तानात पुस्तकांमधून भावी पिढ्यांना एका विशिष्ट मानसिकतेत घडवण्याचा प्रयत्न होतोय, असा दावा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं.
संरक्षण मंत्री ख्याजा यांनी दिलेली मुलाखतीत, पाकिस्तानी मुस्लिम आपल्या हिंदू पूर्वजांचा द्वेष करतो, असा गंभीर मुद्दा उपस्थित केला.
पाकिस्तानचे निम्मे लोक खोटा दावा करतात की, त्यांचे पूर्वज सौदी अरेबिया अथवा इराणहून आले होते, असे ख्याजा आसिफ यांनी म्हंटले.
पाकिस्तानची नवी पिढी आपल्या संस्कृती अन् अस्मितेपासून दुरावली जावी, असा उद्देश असल्याचा आरोप संरक्षण मंत्र्यांनी केला.
पाकिस्तानात हिंदू शासकांचा इतिहास जवळपास पुसला जात आहे, असेही ख्याजा आसिफ यांनी म्हटलं.
चंद्रगुप्त मौर्य, अशोक यांचा इतिहास पुस्तकातून हटवला जातोय कारण ते हिंदू होते, असा गंभीर शेरा देखील ख्याजा आसिफ यांनी म्हटलं.
अमेरिकेच्या युद्धांमध्ये पाकिस्तानचा वापर करण्यासाठी इतिहास मांडला जात असल्याचा गंभीर आरोप ख्याजा आसिफ यांनी केला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अब्राहम करारासाठी आणि स्रायलला मान्यता देण्याच्या आवाहनाच्या तोंडावर ख्याजा आसिफ यांच्या वरील विधानाने खळबळ उडाली आहे.
पूर्व जेरुसलेमला राजधानी बनवून, पॅलेस्टिनी राज्य निर्माण होत नाही, तोपर्यंत इस्लामाबाद इस्रायलला मान्यता देणार नसल्याचे आसिफ यांनी स्पष्ट केलं.