सरकारनामा ब्यूरो
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा भारतातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे.
या अगोदर मेजर ध्यानचंद या पुरस्काराला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखले जात होतं.
ज्या खेळाडूंनी त्यांच्या खेळात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अशा सर्व खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो.
खेलरत्न पुरस्काराबरोबर खेळाडूंना प्रशस्तीपत्र, पदक आणि 25 लाख रुपये इतकी रोख रक्कम दिली जाते.
2020 पर्यंत खेळाडूंना हा पुरस्कार आणि 7.5 लाख रुपयांची रक्कम दिली जात होती.
2020 नंतर यात सुधारणा करुन खेळांडूना आता 25 लाख रुपये रक्कम देण्यात येत आहे.
खेलरत्न पुरस्काराचा उद्देश क्रीडा क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रेरणा मिळावी.
खेलरत्न पुरस्कार मिळणे ही खेळाडूंसाठी खूप अभिमानाची बाब आहे.