Amol Sutar
अधिकाऱ्यांनी पैसे मागितल्यास 'मारा' अन् ॲट्रॉसिटी दाखल करा, असा अजब सल्ला आमदार रत्नाकर गुट्टेंनी दिला आहे.
परभणी जिल्ह्यात एका विकासकामाच्या उद्घाटनासाठी आलेल्या आमदार गुट्टे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले.
रासप आमदार रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात.
विशेष म्हणजे तुरुंगात राहून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती आणि जिंकून देखील आले होते.
2020 मध्ये गुट्टेंवर ईडीने कारवाई करत त्यांच्या गंगाखेड शुगर्सची तब्बल 225 कोटींची मालमत्ता जप्त केली होती. त्यामुळे गुट्टे चर्चेत आले होते.
शासकीय कामासाठी पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्यांना मारण्याचा सल्ला देत त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, असा अजब सल्ला गुट्टे यांनी दिला आहे.
असे वक्तव्य करणाऱ्या गुट्टे यांच्या विधानाने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. त्यांच्या याच वक्तव्याचे राजकीय पडसाद देखील उमटण्याची शक्यता आहे.
गुट्टेंनी म्हटले की, आपण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जवळचे असून, या तिघांनाही असं वाटते की मी त्यांच्याकडे येणार आहे.
त्यांच्या पक्षात येणार आहे असं त्यांना वाटत असले तरी मी लय हुशार आहे. मी सर्व काम करून घेतो, असे गुट्टे म्हणाले.