Rajanand More
जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेला भिडणारा हुकूमशहा म्हणून उत्तर कोरियाचे प्रमुख नेते किम जोंग उन यांची ओळख. बेधडक निर्णय आणि लहरी स्वभावासाठी ते कुप्रसिध्द आहेत.
किम जोंग उन यांचा उत्तराधिकारी कोण, याची जगभरात सतत चर्चा होत असते. त्यांच्या बहिणीसह मुलीचे नाव समोर येत होते. अखेर याबाबत आता महत्वाची माहिती समोर आली आहे.
दक्षिण कोरियाची गुप्तचर यंत्रणा असलेल्या नॅशनल इंटिलिजेंस सर्व्हिसने गुरूवारी (ता. १२ फेब्रुवारी) संसदेतील सदस्यांना बंद दाराआड किम यांच्या वारसदाराबाबत माहिती दिल्याचे समोर आले आहे.
किम कुटुंबाच्या चौथ्या पिढीकडे उत्तर कोरियाची सत्ता जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. किम जोंग उन यांची लेक किम जू ए हिच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
उत्तराधिकारी नियुक्त करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असल्याचे गुप्तचर यंत्रणेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते.
किम जू ए ही केवळ १३ वर्षांची आहे. तिचा जन्म २०१३ मध्ये झाला आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये ती पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमामध्ये दिसली होती.
जानेवारी २०२६ मध्ये तिने कुमसुमन सन पॅलेसचा दौरा केला होता. इथेच उत्तराधिकारी म्हणून पहिले संकेत मिळाले होते.
किम जू ए हिचा सार्वजनिक, सैन्यदलाच्या कार्य़क्रमांमधील वाढता सहभाग, जपान दौरा यांसह विविध घडामोडींमुळे चर्चेला उधाण. महिनाअखेरीस पक्षाची पंचवार्षिक बैठक. यामध्येच उत्तराधिकारी म्हणून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता.