Ganesh Sonawane
सध्या ऑनलाइनच्या जमान्यामध्ये फसवणुकीचे ट्रेंडसुद्धा बदलत आहे. आता फसवणुकीचा 'किराया बॅंक खाता' हा एक नवा फंडा समोर आला आहे.
सायबर भामटे यासाठी कुणाचे तरी बॅंक खाते हे भाडेतत्त्वावर घेतात.
बँकेत जमा होणाऱ्या रकमेच्या दहा ते वीस टक्के रक्कम खातेदार स्वीकारतात आणि या आमिषाला बळी पडतात.
यामध्ये फसवणूक करणारे गुन्हेगार अशा एखाद्या व्यक्तीला हेरतात, की ज्याला पैशाची गरज आहे. त्याला सांगितले जाते, की तुझ्या अकाउंटवर काही पैसे येतील. ते आल्यानंतर आम्हाला काढून देणे. याबद्दल तुला एक विशिष्ट रक्कम मिळेल.
खातेदाराला नवीन सिमकार्ड देऊन त्याचा नंबर फसवणूक करणारे स्वतःकडेच ठेवतात.
आधारकार्ड व पॅनकार्डला त्याच्या लिंककरू नवीन बँकेत खाते काढले जाते व त्या खात्यावरून व्यवहार केले जातात. खात्यात जमा झालेली रक्कम गुन्हेगार स्वतःच काढून घेतात. त्यामुळे भविष्यात तपासही जेव्हा होतो तेव्हा बँक खातेदार सापडतो.
मौजमजा करण्यासाठी तरुण पिढी या 'किराया बॅंक खाता' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रलोभनाला बळी पडत आहे.
कुणाची फसवणूक झाली तरी बँक खाते भाड्याचे असल्याने पोलिसांना मुख्य आरोपीपर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळे खातेदारच यात अडकण्याची शक्यता अधिक असते.
NEXT : वाहनधारकांसाठी गुड न्यूज! HSRP बसवण्याची मुदत पुन्हा वाढली; जाणून घ्या नवी डेडलाईन!