Aslam Shanedivan
अनेकदा रात्री शेतपिकांना पाणी देण्यासाठी जातात किंवा पाणी देताना शेतकऱ्यांना सापांसह विषारी जीवांचा सामना करावा लागतो.
अनेकदा शेतकऱ्यांना संर्पदंशाचा धोका पत्करून शेतातील कामे करावी लागतात. यात कधी कधी संर्पदंश होतो
पण आता या धोक्यापासून शेतकऱ्यांना सतर्क करण्यासाठी 'किसान मित्र' नावाची एक इलेक्ट्रॉनिक काठी तयार करण्यात आली आहे.
या अनोख्या उपायातून १०० मीटर अंतरावरील विषारी साप आणि इतर धोकादायक जीवांपासून शेतकऱ्याला सतर्कतेचा इशारा मिळेल
या काठीचे अनावरण सोमवारी मध्य प्रदेशातील रायसेन येथे आयोजित राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले
ही काठी लपून बसलेल्या सरपटणाऱ्या प्राण्यांना ओळखण्यासाठी सेन्सर्स म्हणून काम करते. हे उपकरण तीव्र कंपन करते.
'किसान मित्र' काठी एका सामान्य काठी सारखे दिसते, पण त्यात एक विशेष सोलर टॉर्च असून ते अंधारात स्पष्ट प्रकाश देते.
भारतात सर्पदंशांमुळे होणारे मृत्यूचे प्रमाण गंभीर असून भारतात सापांच्या सुमारे ३५० प्रजाती आढळतात. ज्यात १० टक्के प्रजातीच विषारी आहेत.