Jagdish Patil
आपल्या देशातील बहुसंख्य लोक शेती व्यवसाय करतात आणि शेतांमध्ये वारंवा साप आढळतात.
अनेक वेळा लोकांना कधी घरात तर कधी शेतात विषारी साप चावल्याच्या घटनाही समोर येतात.
विशेषतः रात्री शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना सापांचा सर्वाधिक धोका असतो.
मात्र, आता शेत असो वा जंगल शेतकर्यांना सापांना घाबरण्याची गरज नाही.
कारण भारतीय शास्त्रज्ञांनी एक काठी तयार केली आहे, जी 100 मीटर अंतरावर साप येताच तुम्हाला अलर्ट करते.
या काठीचं नावं 'किसान मित्र काठी' असं असून ती 100 मीटर अंतरावरील सापांसह इतर विषारी प्राण्यांची उपस्थिती दर्शवते.
या काठीमध्ये एक बटण आहे. जे दाबताच ती सक्रिय होते आणि आसपास साप असल्यास त्याची सूचना देते.
या काठीची माहिती खुद्द केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे.
मध्य प्रदेशमधील रायसेन येथील राष्ट्रीय कृषी मेळाव्या दरम्यान मंत्री चौहान यांनी या काठीची वैशिष्ट्ये सांगितली.
ते म्हणाले, शेतकरी रात्री शेतात जातात तेव्हा साप चावण्याच्या घटना घडतात. मात्र, या काठीमुळे अशा अपघातांपासून त्यांचा बचाव होईल.