Jagdish Patil
अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळाची पाकिस्तानमध्ये तब्बल 21 तास शांती वार्ता झाली.
मात्र, ही शांती वार्ता निष्फळ ठरल्याने अमेरिकेचं शिष्टमंडळ मायदेशी रवाना झालं आहे.
इराणने आमच्या अटी स्वीकारल्या नाहीत, असं अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांनी म्हटलं आहे.
तर अमेरिकेच्या अवास्तव मागण्यांमुळे ही चर्चा निष्फळ ठरल्याचा दावा इराणने केला.
मात्र, या दोन्ही देशांमधील शांती वार्ता नेमकी कशामुळे फिस्कटली ते जाणून घेऊया.
अमेरिकेने युरेनियम संवर्धन पूर्णपणे थांबवण्याची आणि युरेनियमचा साठा काढून टाकण्याची अट घातली.
तर अमेरिकेला होर्मुझच्या सामुद्रधुनीची सुरक्षा स्वतःच्या अटींवर व्यवस्थापित करायची असून ते इराणला मान्य नाही.
इराणने शरणगती पत्कारावी आणि अण्वस्त्र बनवणार नाही याची हमी द्यावी ही अमेरिकेची अट इराणने फेटळाली.
होर्मुझ सामुद्रधुनी, युरेनियम संवर्धन आणि शरणगती या प्रमुख मुद्द्यांवर मतभेद झाल्याने ही चर्चा निष्फळ ठलली.