Pradeep Pendhare
किशोर मुद्रा लोन योजना ही भारत सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) अंतर्गत येणारी एक कर्ज श्रेणी योजना आहे.
वाढत्या किंवा स्थिरावलेल्या लहान व्यवसायांना विस्तारासाठी आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
या लोन योजनेद्वारे 50000 रुपयांपासून ते पाच लाख रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी दिले जाते.
हे कर्ज घेण्यासाठी बँकेकडे कोणतीही गॅरंटी किंवा सेक्युरिटी ठेवावी लागत नाही.
कर्जाची परतफेड करण्यासाठी साधारणपणे तीन ते पाच वर्षांपर्यंतचा कालावधी दिला गेलेला आहे.
हे कर्ज बँक किंवा वित्तीय संस्थांमार्फत दिले जाते, ज्यांचे व्याजदर व्यावसायिक नियमांनुसार ठरतात.
ओळख सांगणारे सर्व कागदपत्र, उद्योग-व्यवसायाचे परवानगीचे कागदपत्र, दोन वर्षांचे आयकर विवरणपत्र आणि विक्रीकर विवरणपत्र आवश्यक असतात.
किशोर श्रेणीसाठीचे दर वार्षिक सुमारे 8.60% पासून पुढे, सार्वजनिक क्षेत्रातील बँका व एनबीएफसीमध्ये ते अंदाजे वार्षिक 11-12% पर्यंत जाऊ शकतात.