सरकारनामा ब्यूरो
वरळी नाका येथील गिरणी कामगाराच्या घरात जन्मलेल्या किशोरी यांनी आपल्या करिअरची सुरुवात परिचारिका म्हणून केली होती.
कौटुंबिक उत्पन्नासाठी पैशाची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट रुग्णालयात काम केले.
बालपण वरळीच्या गिरणीत गेल्याने जगण्यासाठी धडपडणाऱ्या किशोरी पेडणेकर जिद्दी आणि महत्त्वकांक्षी आहेत.
1992 मध्ये त्या शिवसेनेच्या महिला शाखेत सामील झाल्यानंतर त्यांना रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम करण्याची जबाबदारी देण्यात आली.
मुंबईतील लोअर परळमधून तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद पद भूषवले.
कोविड दरम्यान त्या विविध रुग्णालयांना भेट देत तिथल्या प्रत्येक गोष्टींवर वैयक्तिकरित्या लक्ष ठेवून असत.
कुटुंब आणि समाजकार्य हे सर्व करत असताना त्यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक आकांक्षांकडे कधीच दुर्लक्ष केले नाही.
आरोग्य, पाणी आणि स्वच्छता या प्रश्नांना त्यांनी आपल्या कारकीर्दीत प्राधान्य दिले. सर्वसामान्यांना ते नेहमीच सहज उपलब्ध होत असत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या महापौर अशी त्यांची ओळख आहे.